अपेक्षा न करता शेतकऱ्यांची कामे विनाविलंब करावीत - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:45+5:302021-06-18T04:23:45+5:30
पाटोदा : दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्याचा हा कलंक कायमस्वरूपी पुसून काढण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण ...

अपेक्षा न करता शेतकऱ्यांची कामे विनाविलंब करावीत - A
पाटोदा : दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्याचा हा कलंक कायमस्वरूपी पुसून काढण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामांना त्वरित मंजुरी व अंमलबजावणी करावी. या कामासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा आप्पासाहेब राख यांनी दिला.
महाराष्ट्र ग्रामीण रोहयो समितीची तालुका बैठक येथील पंचायत समिती सभागृहात आप्पासाहेब राख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस गटविकास अधिकारी अनंत्रे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्ण लांबरूड, मग्रा रोहयोचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण रोहयो कामाबाबत चर्चा करून, अंमलबजावणीबाबत निर्णय घेतले. शरदचंद्र पवार ग्रामयोजनेंतर्गत असणाऱ्या कामांना, तसेच विहिरी, शेततळे या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे. ही कामे मंजुरी व अंमलबजावणी करताना, कोणत्याही शेतकऱ्यांकडून पैशाची अपेक्षा करू नये. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामे मंजुरी व अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्यास, त्वरित आमदार व पालकमंत्र्यांना सांगाव्यात. त्या अडचणी सोडविल्या जातील. मात्र, शेतकऱ्यांची कामे मुद्दाम अडविणाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा राख यांनी दिला.
या बैठकीला राहुल चौरे, साहेबराव बेदरे श्रीराम तुपे, दादासाहेब पवार, सुनील काळे, शिवाजी भावर, श्रीराम तुपे उपस्थित होते.
===Photopath===
160621\0751popat raut_img-20210616-wa0079_14.jpg