शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:58+5:302021-07-08T04:22:58+5:30
ग्रामपंचायतीकडून मार्गदर्शन अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा ...

शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा
ग्रामपंचायतीकडून मार्गदर्शन
अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा? काय काळजी घ्यायची? कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
बीडमध्ये पथदिवे बंद; नागरिकांना त्रास
बीड : शहरात तीन आठवड्यांनंतर काही भागांतील पथदिवे सुरू झाले. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून डी.पी. रोड, स्टेडियम परिसर, सुभाष रोड भागातील अनेक पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागात रुग्णालय, औषधी दुकाने सुरू असतात, मात्र पथदिवे बंद असल्याने अडचणी येत आहेत.
कडा येथील पुलाची दुरवस्था
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल आता कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक नगर रोडवर अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच मंगल कार्यालये आहेत. येथे असलेल्या गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे नसून सूचनाफलकही लावलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत आणि सूचनाफलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
प्लास्टिकबंदी केवळ कागदावरच
बीड : प्लास्टिक वापरासाठी बंदी असतानाही अंबाजोगाई शहर व परिसरात अजूनही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांमध्ये विविध वस्तू दिल्या जातात. भाजी मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.