पिक कर्ज नाकारल्याने शेतकऱ्याने बँकेत घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 05:20 PM2019-08-07T17:20:22+5:302019-08-07T17:22:27+5:30

बँकेने अर्ज स्वीकारला नसल्याने शेतकरी व्यथित

Farmers take poison in bank due to denial of crop loan | पिक कर्ज नाकारल्याने शेतकऱ्याने बँकेत घेतले विष

पिक कर्ज नाकारल्याने शेतकऱ्याने बँकेत घेतले विष

Next

धारूर (बीड) : येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जाचे अर्ज स्वीकारत नसल्याने एका शेतकऱ्याने शाखा व्यवस्थापकाच्या कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. राजाभाऊ बंकट कांदे (40) असे शेतकऱ्याचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. 

जहागीरमोहा येथील शेतकरी राजेभाऊ कांदे हे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जासाठी वांरवांर चकरा मारत होते.मात्र, बँकेकडून त्यांचा अर्ज स्वीकारल्या जात नव्हता. यामुळे व्यथित झालेल्या कांदे यांनी बुधवारी दुपारी शाखाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांदे यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Farmers take poison in bank due to denial of crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.