शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

शेतकरी अनुदानावर बँकांकडून डल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:37 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा होत आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा : आदेशाला हरताळ

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा होत आहे.जिल्हा दुष्काळाच्या खाईत हरपळत असतना शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाचे पैसे जिल्ह्यातील बँकांकडून कर्जाच्या रकमेमध्ये वळते केले जात आहेत. मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी आशा असताना बँकाकडून ही रक्कम वळती केली जात असल्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर जिल्हा बँकेमध्ये शेतकºयांचे खाते मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी जमा झालेल्या अनुदानाची रक्कम देखील अधिक आहे.ही रक्कम इतर बँकांमध्ये ठेव स्वरुपात ठेवल्यामुळे शेतकºयांना वेळेवर अनुदान दिले जात नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत शेतकºयांचे जवळपास ८४५ कोटी रुपये अनुदान अडकले आहे. या दुष्काळी गंभीर परिस्थितीमध्ये शेतकºयांचे हाल होत असताना देखील जिल्हा बँकेकडून हा बनाव केला जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बँकेच्या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.तसेच प्रशासनाने देखील या प्रकरणी जिल्हा बँकेची व इतर बँकेची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.चालू वर्षात ८४५ कोटीचे विमा व अनुदानसोयाबीनसोडून इतर कापूस,मूग,तूर,उडीद, तीळ यासर इतर पिकांच्या विम्यापोटी ३४६ कोटी ३९ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे ही रक्कम देखील कर्जातून वळती करुन घेतली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्हा बँकेककडे यापुर्वीच खरीप दुष्काळी अनुदानापोटी ४२८ कोटी रुपये मार्च महिन्यात वर्ग करण्यात आले आहेत तर २०१६ अतिवृष्टी अनुदानापोटी ६८ कोटी रुपये प्रशासनाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहेत.यापैकी राष्ट्रीय कृत बँकेतील अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. मात्र, जिल्हा बँकेकडून अनुदानाची रक्कम वाटप करण्यात हलगर्जीपणा केला जात आहे. तसेच इतर बँकेतून कर्जाची रक्कम वळती केली जात आहे.आरबीआयकडून बँकांनाआदेश देण्याची गरजकर्जाच्या रकमेमधून अनुदान व विम्याची रक्कम वळती करु नये, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत असे विचारले असता, लीड बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण म्हणाले, सर्व राष्ट्रीयकृत बँकाना भारतीय रिर्झंव बँकेने पत्राद्वारे असे आदेश देण्याची आवश्यकता असते, असे पत्र प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम वळती केली जाणार नाही.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र