शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी घाई न करता तत्काळ ऑनलाईन नोंदणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:26+5:302021-01-08T05:49:26+5:30
कासारी येथील शासकीय हमीभाव केंद्रात ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून लवकरच तूर खरेदीसही सुरुवात होणार आहे. तुरीला शासकीय हमीभाव ...

शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी घाई न करता तत्काळ ऑनलाईन नोंदणी करावी
कासारी येथील शासकीय हमीभाव केंद्रात ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून लवकरच तूर खरेदीसही सुरुवात होणार आहे. तुरीला शासकीय हमीभाव सहा हजार प्रति क्विंटलप्रमाणे जाहीर झाला असून आष्टी तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रावर आपली तूर विक्री करावी. एक महिन्यापासून शेतकरी आपल्याकडील तूर कवडीमोल भावाने म्हणजे ४५०० ते ५००० रुपये प्रति क्विंटलने विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० ते १००० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. जानेवारी अखेरपर्यंत तुरीचे भाव शासकीय हमीभावापेक्षा म्हणजेच प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार प्रति क्विंटल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडील तूर विक्रीची घाई करू नये , सातबारा, ८अ, पीक पेरा, आधार कार्ड, बँक पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह तत्काळ शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करून ठेवावी म्हणजे आपला तोटा होणार नाही. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी काडीकचरा नसलेला, चाळणी करून माल खरेदी केंद्रावर आणावा व बारापेक्षा जास्त आर्द्रता नसावी. ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन अण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे.