पोकरा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:10+5:302021-02-05T08:24:10+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्या गावांची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत झाली आहे. अशा शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजना व ...

पोकरा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - A
तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्या गावांची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत झाली आहे. अशा शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजना व इतर योजनांसाठी अर्ज भरताना मोबाईल नंबर, आधार नंबर, प्रकल्पाचे बिनचूक ठिकाण, बँकेचे नाव, अचूक बँक खाते क्रमांक व इतर अधिक माहिती परिपूर्ण अर्जासह सादर करावी. कृषी संजीवनी समिती बैठकीत पात्र अर्जदारांना मंजुरी मिळाल्यानंतर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व इतर कृषी विभागातील अधिकारी योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांचे अर्ज तत्काळ मार्गी लावण्यात प्रयत्नशील राहतील. या योजनेमधून शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणाशी सक्षमपणे सामोरे जाण्याकरिता तयार करण्याचे ध्येय शेतकऱ्यांचे श्रम व शासनाच्या योजनेच्या माध्यमातून सहज शक्य करता येईल. शेतकरी बांधवांनी आपणास योग्य असलेल्या घटकाची निवड करताना त्याचा फायदा व स्वतःसाठी घटकांची आवश्यकता याचा विचार करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुपेकर यांनी केले आहे.