...
पीक विमा भरण्याचे आवाहन
आष्टी : खरीप हंगामातील पीक विमा भरण्याची मुदत १५ जुलै आहे. विमा भरण्यासाठी केवळ पाचच दिवस शिल्लक राहिले आहेत; परंतु गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्ह्याला विमा न मिळाल्याने शेतकरी वर्गात यंदा भरण्यासाठी उदासीनता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पीक विमा भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
...
कांबळी नदीवरील पुलांची उंची वाढवा
धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा-म्हसोबावाडी फाट्यादरम्यान रस्त्यावरील पिंपरखेड, तर सुलेमान देवळा येथे कांबळी नदीवरील पूल आहे; परंतु हे कमी उंचीचे आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर या रस्त्यावर वाहतूक ठप्प होते. या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
.....
रस्ता डांबरीकरणाची मागणी
कडा : आष्टी तालुक्यातील दादेगाव-हिवरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम झाले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पायी चालणेदेखील मुश्कील होते. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
.....