शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा; जास्त आलेले ५० हजार रुपये केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST2021-03-23T04:35:56+5:302021-03-23T04:35:56+5:30
सामान्यतः आज पैशासाठी सामाजिक मूल्यांची झालेली घसरण हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण अनेक वेळा ...

शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा; जास्त आलेले ५० हजार रुपये केले परत
सामान्यतः आज पैशासाठी सामाजिक मूल्यांची झालेली घसरण हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण अनेक वेळा आपणास पहावयास मिळते त्यावेळी अशा व्यक्तींच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुकाने पाहिले जाते. असाच काहीसा प्रकार माजलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये घडला. बँकेतील शेतकरी खातेदार बाबासाहेब श्रीमंत यमगर यांना बँक कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने ५० हजार रुपये जास्त अदा करण्यात आले. ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्याने बँकेचे शाखा अधिकारी विजयकुमार फटके यांच्या ताबडतोब निदर्शनास आणून देत ही रक्कम बँकेला परत केली. बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत सत्कार केला. यावेळी सहायक व्यवस्थापक जी. आर. बोरूडे व बँकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
220321\save_20210322_170153_14.jpg