पीकविम्यासाठी शेतकरी कोरोना विसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST2021-09-05T04:37:19+5:302021-09-05T04:37:19+5:30
गेवराई : तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपनीकडे अर्ज ...

पीकविम्यासाठी शेतकरी कोरोना विसरले
गेवराई : तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपनीकडे अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता, तर सोशल डिस्टन्सदेखील नसल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. गेवराई तालुक्यात सोमवारी मध्यरात्री अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. यात तूर, कापूस, मूग, सोयाबीन, उसाचे मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीचा पीकविमा भरला असेल, अशा शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत म्हणजे तीन दिवसांत १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर या तीन दिवसांत विमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करायचे होते. ते अर्ज करण्यासाठी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
.... नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांसाठी खर्च न करता आपापल्या गावातच ऑनलाइन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी एच. व्ही. खेडकर यांनी केले आहे.
040921\20210903_123727_14.jpg