पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:15+5:302021-06-28T04:23:15+5:30

रविवारी संध्याकाळपासून गेवराई व तालुक्यात पावसाने दोन तास हजेरी लावली. अंबाजाेगाई तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परळी शहर व ...

The farmer rejoiced at the arrival of the rains | पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदला

पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदला

रविवारी संध्याकाळपासून गेवराई व तालुक्यात पावसाने दोन तास हजेरी लावली. अंबाजाेगाई तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परळी शहर व परिसरात दुपारी एक वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला तर सायंकाळीदेखील चांगली हजेरी लावली. बीड व तालुक्यातही सायंकाळी पावसाची झड सुरू होती. जिल्ह्यात २७ जूनपर्यंत सरासरी १४७.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शिरसदेवी परिसरात पेरणीची लगबग

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु मृगाच्या उत्तरार्धात पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शिरसदेवीसह लोणावळा, मारफळा, वाहेगाव रूई, भेंडटाकळी, भेंड, सुल्तानपूर, तांडा, चिंचोली, रानमळा भाटेपुरी परिसरात पाऊस झाला. जमिनीत ओल खोलवर गेल्यामुळे शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, बाजरी, मका, कापूस, भुईमुगाच्या पेरणीला लागला आहे.

===Photopath===

270621\27_2_bed_32_27062021_14.jpg

===Caption===

शिरसदेवीत पेरणीची लगबग

Web Title: The farmer rejoiced at the arrival of the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.