आरणवाडी येथे भाजीपाला विषयावर शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:31+5:302021-07-12T04:21:31+5:30
जिल्ह्याचे प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.जी.मुळे व तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ...

आरणवाडी येथे भाजीपाला विषयावर शेतीशाळा
जिल्ह्याचे प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.जी.मुळे व तालुका कृषी अधिकारी एस. डी. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतीशाळा आयोजित केली होती. या शेतीशाळेत पीक पाणी व्यवस्थापनाविषयी माहिती देण्यात आली. तसेच बुरशीनाशकांचा योग्य उपयोग योग्य वेळी कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महागडे रासायनिक कीटकनाशके न वापरताही सेंद्रिय पद्धतीने अल्प खर्चात शेती कशाप्रकारे करता येते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी आत्मा विभागाचे ज्ञानेश्वर धस,संतोष देशमुख सरपंच लहू फुटाणे, बंडू काळे यांनी शेतीशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या शेतीशाळेत भाजीपाला उत्पादक आणि नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
110721\img-20210711-wa0133.jpg~110721\img-20210711-wa0132.jpg
आरणवाडी येथे भाजीपाला विषयावर शेतीशाळा~तालूक्यातील आरणवाडी येथे शेतकऱ्यांन साठी आयोजीत शेतीशाळे चे वेळी