कांबी मंजरा येथे शेती दिन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:12+5:302021-01-08T05:47:12+5:30
मोकाट गुरांमुळे अपघातास निमंत्रण बीड : शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहन कोंडी होत आहे. तसेच गुरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत ...

कांबी मंजरा येथे शेती दिन कार्यक्रम
मोकाट गुरांमुळे अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहन कोंडी होत आहे. तसेच गुरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्यामुळे वाहनधारकांना रस्ताही रहात नसल्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. मोकाट जनावरांना आवर घालण्याची गरज आहे. शहरातील प्रमुख चौक, नगर रोड, धुळे-सोलापूर महामार्गावर या गुरांचा वावर अधिक असल्याने अनेक वेळा वाहतूक कोंडीही होत अहे.
ई-पीक ॲपचे प्रात्यक्षिक
बीड : गेवराई तालुक्यातील कोळगावसह खडकी, साठेवाडी, मानकापूर, उक्कडपिंप्री या गावात तलाठी डी.ए. शेळके, एस.ए. गुंजाळ यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपबद्दल प्रत्यक्ष शेतात जाऊन माहिती दिली. तसेच मोबाइलवर ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची लागवड नोंद करण्यासंदर्भात प्रात्यक्षिकदेखील करून दाखविले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी स्वत: या ॲपवर करणे आवश्यक असल्याचे तलाठी शेळके यांनी सांगितले.