शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या कुटुंबाचा वडवणीजवळ अपघात; तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 8:06 PM

चिमुकला बचावला : मयत पाथरी तालुक्यातील रहिवाशी

ठळक मुद्देभरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली.यामध्ये सर्वच जण उडून रस्त्यावर फेकले गेले.

बीड/वडवणी : नातेवाईकाचे लग्न लावून दुचाकीवरून परतताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दाम्पत्यासह त्यांची एक मुलगी जागीच ठार झाली. तर चार वर्षाचा चिमुकला यातून बचावला आहे. हा अपघात वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांड्याजवळ बीड-परळी हायवेवर घडला. मयत सर्व पाथरी (जि.परभणी) तालुक्यातील रहिवाशी आहेत.

नंदकुमार उर्फ गणेश कैलास राठोड (२८), रोशन गणेश राठोड (११) व शोभा गणेश राठोड (२५ सर्व  रा.सुंदरनगर तांडा ता.पाथरी) अशी मयतांची नावे आहेत. तर रोहन गणेश राठोड (४) हा अपघातातून सुदैवाने बचावला आहे. गणेश राठोड हे आपल्या दुचाकीवरून (एमएच २० एएन ९१७) उपळी (ता.वडवणी) येथे लग्नासाठी आले होते. दुपारचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर ते सर्व दुचाकीवरून पुन्हा गावी परतत होते. याच दरम्यान ब्रम्हनाथ तांड्याजवळ एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सर्वच जण उडून रस्त्यावर फेकले गेले. गणेश, शोभा आणि रोशन या तिघांच्याही डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर रोहन हा गंभीर जखमी झाला. त्याला परिसरातील लोकांनी तात्काळ वाहनातून माजलगावला उपचारासाठी हलविले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वडवणी ठाण्याचे सपोनि सुरेश खाडे, मनोज जोगदंड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रूग्णवाहिकेतून कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले आहेत. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. नातेवाईकांना माहिती दिली असून काही नातेवाईक आरोग्य केंद्रात दाखल झाल्याचे समजते.

हेल्मेट वापरण्याची गरजदुचाकीवर प्रवास करताना पोलिसांकडून वारंवार हेल्मेट वापरण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. मात्र, वाहनधारकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. या अपघातातही केवळ डोक्याला मार लागल्यानेच तिघांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. महामार्ग पोलिसांकडून याबाबत जनजागृती सुरू असल्याचे पोउपनि भास्कर नवले यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्गBeedबीड