आंदोलनादरम्यान भाजपमध्ये गटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:45+5:302021-06-27T04:21:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : ओबीसी आरक्षण व इतर विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने माजलगाव येथे शनिवारी रास्ता रोको करण्यात ...

आंदोलनादरम्यान भाजपमध्ये गटबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : ओबीसी आरक्षण व इतर विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने माजलगाव येथे शनिवारी रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनादरम्यान, भाजपमध्ये गटबाजी दिसून आली. भाजपचे रमेश आडसकर यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे नेतृत्व केले, तर माजी आमदार मोहन जगताप व नितीन नाईकनवरे यांनी स्वतंत्रपणे आंदोलन केले. यावरून माजलगाव तालुक्यातील भाजपत उघड गटबाजी दिसून आली.
ओबीसींच्या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. एका गटाचे नेतृत्व रमेश आडसरांनी केले, तर जगताप-नाईकनवरे गटाने आपला स्वतंत्र सवतासुभा रस्त्यावर उभा केला.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने शहरात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आडसकर यांनी सिंदफना पुलावर रास्ता रोको केला, तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप व नितीन नाईकनवरे यांनी शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको केला. दोन ठिकाणी आंदोलने झाल्याने भाजपाची दुफळी चव्हाट्यावर आली. आडसकर यांच्यासोबत भाजपचे
सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते दिसून आले, तर मोहन जगताप-नितीन नाईकनवरे यांच्या आंदोलनात त्यांचा कायमस्वरूपी असणारा मित्रमंडळाचा सवतासुभा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला. दरम्यान, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
===Photopath===
260621\purusttam karva_img-20210626-wa0063_14.jpg~260621\purusttam karva_img-20210626-wa0034_14.jpg