शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

जायकवाडीतील पाणी चोरीप्रकरणी शपथपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:52 IST

जायकवाडी धरणातील ३१ टीएमसी (८८८.९१ क्युबिक मीटर) पाणी चोरीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादींना शपथपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली असून औरंगाबाद महापालिकेला नव्याने प्रतिवादी करून त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सुनावणी २६ जुलैला होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी धरणातील ३१ टीएमसी (८८८.९१ क्युबिक मीटर) पाणी चोरीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादींना शपथपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली असून औरंगाबाद महापालिकेला नव्याने प्रतिवादी करून त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सुनावणी २६ जुलैला होणार आहे.कोपरगावमधील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फ त जायकवाडी धरणातील पाणी चोरीप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने यापूर्वी राज्य शासनास नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर शासनाने शपथपत्र दाखल करण्यासाठी मुदत मागितली होती. त्यामुळे खंडपीठाने मुदतवाढ दिली.काळे यांनी माहितीच्या अधिकारात जायकवाडी धरणातील पाण्याबाबत माहिती मागितली असता असे निदर्शनास आले की, जायकवाडी धरणात १५ आॅक्टोबर २०१६ च्या पुढे पाण्याचा एकूण साठा २५३१.६० क्युबिक मीटर, तसेच वापरात असलेल्या पाण्याचा साठा १७९३.४९ क्युबिक मीटर असून, मृत साठा ७३८.११ क्युबिक मीटर होता. तसेच दिनांक १ जुलै २०१७ च्या पुढे पाण्याचा एकूण साठा ११३५.१० क्युबिक मीटर होता. वापरात असलेल्या पाण्याचा साठा ३९६.९९ क्युबिक मीटर तर मृत साठा ७३८.११ क्युबिक मीटर इतका होता.दिनांक १५ आॅक्टोबर २०१६ ते १ जुलै २०१७ दरम्यान वास्तविक पाहता जायकवाडी धरणातील पाण्याचा वापर हा सिंचन नसलेल्या भागात पाणी वापर ७३.२८ क्यु. मी. होतो. त्यामधून ७८५.२६ लाखपर्यंतचा महसूल प्राप्त होत होता. तसेच सिंचन असल्याचा पाण्याचा वास्तविक वापर ४.७५ क्यु. मी. इतका होता. त्यामधून ३.८१ लाख रुपये इतका महसूल प्राप्त होत होता. तसेच लिफ्ट सिंचनातून व इतर हेतूंसाठी २९.५४ क्यु. मी. इतका साठा वापरात येत होता. ह्या सर्व माहितीतून असे निदर्शनास आले की जायकवाडी धरणात १२८८.९१ क्यु. मी. पाणी होते. त्यापैकी २० टक्के बाष्पीभवन होऊन ८८८.९ क्यु. मी. ची चोरी झाल्याचे स्पष्ट होते. त्याची किंमत अंदाजे ९५०० लाख रुपये असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :DamधरणAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका