चार्जिंगला लावलेला मोबाइल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST2021-09-02T05:12:54+5:302021-09-02T05:12:54+5:30

..... सासुरा येथे एकास लाथाबुक्क्याने मारहाण केज : तालुक्यातील सासुरा येथे कौटुंबिक विषयात पडू नको, असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण ...

Extended charging mobile | चार्जिंगला लावलेला मोबाइल लांबविला

चार्जिंगला लावलेला मोबाइल लांबविला

.....

सासुरा येथे एकास लाथाबुक्क्याने मारहाण

केज : तालुक्यातील सासुरा येथे कौटुंबिक विषयात पडू नको, असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील सासुरा येथे ३० ऑगस्ट रोजी घडली. शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. धोंडीराम भानुदास पाळवदे (५४) असे जखमीचे नाव आहे. आत्माराम रामभाऊ पाळवदे यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

....

गेवराईत कारच्या धडकेने डॉक्टर जखमी

गेवराई : येथील एसबीआयसमोर कारने (एमएच २३ एडी ६२१२) डॉ. मोमीन अब्दुल रौफ यांच्या दुचाकीला (एमएच २३ बीडी ७७४९) पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. यात डॉ. रौफ व अन्य एक जखमी झाले. याप्रकरणी डॉ. रौफ यांच्या तक्रारीवरून गेवराई ठाण्यात कारचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला.

.....

Web Title: Extended charging mobile