धुनकवड येथे विहिरीत जिलेटीनचा स्फोट; चार जण जखमी, दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:23+5:302021-03-21T04:32:23+5:30
धारुर तालुक्यातील धुनकवाड येथील सूर्यनारायण यादव यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु आहे. शनिवारी सकाळी सात ते ...

धुनकवड येथे विहिरीत जिलेटीनचा स्फोट; चार जण जखमी, दोघे गंभीर
धारुर तालुक्यातील धुनकवाड येथील सूर्यनारायण यादव यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु आहे. शनिवारी सकाळी सात ते आठच्या सुमारास विहिरीत काम करत असताना जिलेटीनच्या कांडीचा अचानक स्फोट झाला. अंदाज न आल्याने यात चार जण जखमी झाले आहेत. जखमीत दोघांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमीवर डॉ. चेतन आदमाने, डॉ. परवेज शेख यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. जखमीना लातूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमीत जमीन मालक भागवत विष्णू यादव (वय २५, रा.धुनकवाड) यांच्यासह नागनाथ बालासाहेब तोंडे (वय २७), आशोक लक्ष्मण तोंडे (वय २०), बाबूराव राजेभाऊ तोंडे (वय २५, रा. सर्व देव दहिफळ) यांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी भेट दिली असून या घटनेची चौकशी त्या करत आहेत.
===Photopath===
200321\anil mhajan_img-20210320-wa0065_14.jpg~200321\anil mhajan_img-20210320-wa0066_14.jpg
===Caption===
धुनकवड येथे विहिरीत जिलेटीनच्या स्फोटात चार जण जखमी झाले असून दोघे गंभीर आहेत. उपचार चालू असतानाचे छायाचित्र.~