शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार हे आधी सांगा; आ. मेटे यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 13:33 IST

Maratha Reservation : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. सतत दुर्लक्ष केले

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये.

बीड : सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजावर आकाश कोसळले आहे. यामुळे मराठा समाजाच्या मुला-मुलींचे भविष्य अंधकारमय झाले आहे. हे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोकराव चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखविण्यापेक्षा मराठा समाजासाठी स्वतः काय करणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी केली आहे.   राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. सतत दुर्लक्ष केले,त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झाले असा आरोप आ. विनायक मेटे यांनी केला. यामुळेच मराठा समाजावर राज्य सरकारने केलेल्या अन्यायाच्या विरोधात आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये. तर मराठा समाजाला न्याय कसा देणार, आरक्षण कसे देणार,कोणत्या सोयीसवलती देणार हे आधी सांगावे अशी मागणी आ. मेटे यांनी केली आहे. तसेच अशोकराव चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजावर ही वेळ आली असल्याने त्यांची त्वरित मंत्रिमंडळातून हकालपट्टी कारवाई अशीही मागणी आ. मेटे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

लॉकडाऊननंतर बीडमध्ये पहिला मोर्चा निघणारदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर गुरुवारी आमदार मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी,  राज्य सरकाच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. या निर्णयाचा मोठा परिणाम मराठा समाजातील पुढील पिढीवर होणार आहे. त्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. त्यामुळे आता शांत बसणे परवडणार नाही. त्यामुळे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन २०१६ सालाप्रमाणे मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे. १५ तारखेला लॉकडाऊन संपले तर पुढील काही दिवसांत पहिला मोर्चा बीडमध्ये काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshok Chavanअशोक चव्हाणVinayak Meteविनायक मेटे