खळळजनक ! अंबाजोगाईत भररस्त्यावर तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

खळळजनक ! अंबाजोगाईत भररस्त्यावर तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

अंबाजोगाई : शहरातील मोरेवाडी परिसरात २० वर्षीय तरूणाचा भर रस्त्यावर निर्घुण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.०१) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झाली. या घटनेने शहरात खळबळ उडाली.

गणेश सुंदरराव मोरे (वय २०, रा. मोरेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार मोरेवाडी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ लोखंडी सावरगाव रोडवर गणेश मोरे याच्यावर काही व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने गणेशवर वार करण्यात आले.  हल्ल्यात अत्यावस्थ झालेल्या गणेशला स्वाराती रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार, पीएसआय सूर्यवंशी, कांबळे, एएसआय बोडखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनमुळे शहरात प्रचंड खळबळ आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत गणेश हा एका वाॅटर प्लान्टवर कामाला होता असे समजते.

Web Title: Exciting! In Ambajogai, a young man was brutally stoned to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.