शंकर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:45+5:302021-02-05T08:25:45+5:30
बीड : केज तालुक्यातील साळेगाव येथील शंकर विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच कैलास पाटील, उपसरपंच श्रीमंत ...

शंकर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात
बीड : केज तालुक्यातील साळेगाव येथील शंकर विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच कैलास पाटील, उपसरपंच श्रीमंत गीते, पांडू दादा इंगळे, ओम प्रकाश मुळे, बब्रुवान इंगळे, श्रीहरी जाधव, शिवाजी इंगळे, गौतम बचुटे, रवी जोगदंड, मुख्याध्यापक पी. एम. देशमुख, एस. जी. तांबारे, सय्यद अकबर पटेल, जी. एच. म्हेत्रे, आर. एन. गीते, एस. बी. घोडके, के. के. म्हैत्रे, एच. आर. नखाते, एस. बी. गालफाडे, पी. एस. केंद्रे, आर. आर. देशमुख, ए. बी. रोडगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
पुण्यतिथीनिमित्त भगवानबाबा यांना अभिवादन
बीड : संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड येथील माउली दवाखान्यात माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रवीण ढगे, डॉ. विठ्ठल ढगे, सागर घोडके, गोकूळ काळे, डॉ. अजय पवार, डॉ. शिल्पा घुले,
डॉ. प्रियंका, डॉ. स्नेहल, डाॅ. आयेशा, डॉ. ज्योती, महेश खाडे, संजय सोनवणे व सुरेखा देवधरे यांची उपस्थिती होती.