उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:51+5:302021-06-03T04:23:51+5:30

बीड : दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ...

Excise inspector caught taking bribe | उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास लाच घेताना पकडले

उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास लाच घेताना पकडले

बीड : दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड कार्यालयातील निरीक्षक दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर यांना बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

तक्रारदाराविरुद्ध दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये नाव कमी करण्यासाठी निरीक्षक दिंडकर याने ७५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती. त्यामुळे ३१ मे रोजी त्याने औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाकडे तकार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने ३१ मे रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक दत्तात्रय दिंडकर यांनी ७५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. २ जून रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या बीड येथील निरीक्षक कार्यालयात सापळा लावला असता निरीक्षक दिंडकर यास पंचासमक्ष ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाचे पाेलीस अधीक्षक राहुल खाडे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, पोलीस उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस अंमलदार मिलिंद इप्पर, रवीद्र काळे, भूषण देसाई, चालक अंमलदार चंद्रकांत शिंदे यांनी सापळा यशस्वी केला.

Web Title: Excise inspector caught taking bribe