वन रँक वन पेन्शनप्रकरणी माजी सैनिक रस्त्यावर उतरले
By अनिल भंडारी | Updated: April 3, 2023 18:27 IST2023-04-03T18:26:56+5:302023-04-03T18:27:23+5:30
जवानांच्या वन रँक वन पेन्शनमध्ये केंद्र सरकारकडून भेदभाव आणि अन्याय होत आहे.

वन रँक वन पेन्शनप्रकरणी माजी सैनिक रस्त्यावर उतरले
बीड : वन रँक वन पेन्शनमध्ये केंद्र सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर सुरू असलेल्या जवानांच्या धरणे आंदोलनाला सोमवारी बीड येथे रस्त्यावर उतरत माजी सैनिकांनी पाठिंबा दर्शविला.
भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत देशासाठी कर्तव्य बजावलेल्या जवानांच्या वन रँक वन पेन्शनमध्ये केंद्र सरकारकडून भेदभाव आणि अन्याय होत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ नवी दिल्ली येथे फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ, जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने सोमवारी बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सैनिकांना योग्य न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात एक हजारावर माजी सैनिक सहभागी होते, असा दावा त्रिदल सैनिक सेवा संघाचे सचिव हनुमान झगडे यांनी केला.