शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

Parali Vidhan Sabha Election 2024: ईव्हीएम मशीनचा क्रम चुकला; महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंचा पारा चढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 12:28 IST

माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी तत्काळ दिंद्रुड येथे मतदान केंद्रावर धाव घेत अधिकाऱ्याला विचारला जाब

बीड: जिल्ह्यातील माजलगावच्या दिंद्रुड येथे मतदान बूथ केंद्र क्रमांक 199 मध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना चुकलेल्या क्रमामुळे मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतला. याची माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार तथा आमदार प्रकाश सोळंके यांनी मतदान केंद्रांवर धाव घेतली. येथे निवडणूक अधिकाऱ्याला जाब विचारत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोळंके यांनी माहिती दिली. त्यानंतर ईव्हीएम मशीनचा क्रम दुरुस्त करण्यात आल्याची माहिती आहे. 

मतदान प्रतिनिधी धैर्यशील ठोंबरे यांनी सकाळी मतदान करते वेळी ईव्हीएम मशीनचा क्रम ३, २, १ असा उलटा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले, मात्र, अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. याची माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी तत्काळ दिंद्रुड येथे मतदान केंद्रावर धाव घेतली. एकूण सहा बूथ असताना एकाच बुथवर हा क्रमांक कसा चुकला याबाबत आमदार सोळंके यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे याची माहिती दिली. त्यानंतर ईव्हीएम मशीनचा क्रम दुरुस्त करण्यात आला. 

मतदारसंघात ३४ उमेदवारमाजलगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३४ उमेदवार आहेत. यामुळे तीन ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या आहेत. यावर आमदार सोळंके यांचा क्रमांक एक आहे. त्यानंतर इतर उमेदवारांचे क्रमांक आहेत. मात्र, मशीन ठेवण्याचा क्रम चुकल्याने गोंधळ उडाला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवPrakash Solankeप्रकाश सोळंके