बिले भरूनही शेतकऱ्यांना उच्च दाबाची वीज मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:11+5:302021-04-10T04:33:11+5:30
माजलगाव : तालुक्यातील लोणगाव ३३ के.व्ही. अंतर्गत येणाऱ्या दहा ते बारा गावांच्या शेतकऱ्यांनी शेती पंप व घरगुती ...

बिले भरूनही शेतकऱ्यांना उच्च दाबाची वीज मिळेना
माजलगाव : तालुक्यातील लोणगाव ३३ के.व्ही. अंतर्गत येणाऱ्या दहा ते बारा गावांच्या शेतकऱ्यांनी शेती पंप व घरगुती मिटरच्या बिलांचा भरणा करूनही उच्च दाबाची वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. तर संबंधित आधिकाऱ्यांना विचारणा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जात आहे.
लोणगाव ३३ के.व्ही. विभागातील दहा ते बारा गावातील शेती पंप व घरगुती वीज जोडणी बिल न भरल्याने तोडली होते. या वेळी वीज वितरण कंपनीच्या आधिकाऱ्याने सवलत देऊन शेतकऱ्यांकडून शेती पंपाचे व घरगुती मिटरची बिले भरून घेतली व वीज जोडणी करुन दिली. बिले भरताच वीज पुरवठा सुरू करण्यात आला, पण काहीच उपयोग झाला नाही. मागील आठ दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा केला जात आहे. परिणामी शेती पंप चालत नाहीत. शेतकऱ्यांनी उसनवारी ,सावकाराकडून पैसे घेऊन बिले भरले. बिले भरुनही लाईट कमी दाबाची येत आहे. विहीर, बोअरला मुबलक पाणी असुनही पिके विजेअभावी जळून जात आहेत. शेतकरी वीज वितरण कंपनीच्या आधिकाऱ्यांना वीज कमी दाबाने का येते, अशी विचारणा करतात तर समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अधिकारी अरेरावीची भाषा करतात. जा काय करायचे ते करा लाईट जर उच्च दाबाची सोडली तर ट्रान्सफार्मर जळून जाईल, अशी भाषा करू लागल्याने बिले भरून ही उच्च दाबाची लाईट मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून जात आहेत.
लाखो रुपये थकबाकी आहे. पाच हजार भरले म्हणजे काय झाले? लोणगाव ३३ के. व्ही. मधून वीज बरोबर जात आहे. शेतकऱ्यांनी आपले शेती पंप चालत नसतील तर कॅपेसिटर बसवून घ्यावे.
-- डी.एस. स्थूल, उप कार्यकारी अभियंता,
तेलगाव उपविभाग.
विज बील भरुन काहीच उपयोग झाला नाही. वीज तोडली तेव्हा आठ दिवस लाईट नव्हती. तर आता लाईट आहे तर ती खुप कमी दाबाने मिलते. यावर मोटार चालत नाही. त्यामुळे माझा ऊस पाणी असून जळून गेला आहे.
-- बळीराम घायतिडक
शेतकरी,उमरी
बील भरुनही शेतकऱ्यांना लाईट नियमित उच्च दाबाची मिळत नसेल व शेतकऱ्यांना आधिकारी अरेरावीची भाषा करत असेल तर अशा आधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू -- ॲड. नारायण गोले, शेतकरी कामगार पक्ष.