चारशे वर्षांनंतरही जाणता राजाची जाणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:36 IST2021-02-20T05:36:32+5:302021-02-20T05:36:32+5:30
शिरूर कासार : कोरोना महामारीचे अरिष्ट अजूनही टळले नसल्याने छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव मिरवणुकीविनाच पार पाडावा लागला. असे असले ...

चारशे वर्षांनंतरही जाणता राजाची जाणीव
शिरूर कासार : कोरोना महामारीचे अरिष्ट अजूनही टळले नसल्याने छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव मिरवणुकीविनाच पार पाडावा लागला. असे असले तरी शिवरायांप्रती असलेला आदरभाव चारशे वर्षांनंतरही कायम ठेवत जाणता राजाला शुक्रवारी घरोघरी अभिवादन करण्यात आले. येथील संभाजीराजे चौकात मोजक्याच उपस्थितीत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रत्येकाने अभिवादन करत पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी जि. प. सदस्य शिवाजी पवार, नगराध्यक्ष दत्ता पाटील, मा. उपनगराध्यक्ष बाबूराव झिरपे, प्रताप कातखडे, कृष्णा थोरात, वैभव झिरपे, दिनेश गाडेकर, महादेव भांडेकर, अशोक कातखडे, अमोल चव्हाण, नशीर शेख, असलम शेख, आदिनाथ काटे, उमेश सुरवसे, सावता कातखडे आदींची उपस्थिती होती.
भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर, सेवानिवृत्त पोलीस चंद्रकांत थोरातसह अनेकांनी आपल्या घरीच शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.