शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत वीज बंद तरीही शेतकऱ्यांना लाखोंचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:29 IST

शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे दुष्काळात तेरावा : वाढीव वीज बिले तात्काळ दुरुस्त करून देण्याची शेतक-यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे.अंबाजोगाई तालुक्यात सन २०१२-१३ सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या कालावधीत पूस, गिरवली परिसरातील विद्युत पंप बंद राहिले. तरीही महावितरणच्या वतीने चालू विद्युत बिलात या काळातील रकमा शेतकºयांच्या नावावर टाकण्यात आल्या. टंचाईच्या काळात जिल्हाधिकाºयांनी ज्या ठिकाणचे विद्युतपंप बंद आहेत. तसेच आरक्षित तलावाच्या क्षेत्रातील ज्या कृषी पंपाचे वीजजोडणी बंद केलेली आहे. अशा ग्राहकांना बिलात सवलत मिळावी. असे आदेश महावितरणला दिले होते. तीन वर्षानंतर त्या बंद विद्युतपंपांची रक्कम आता पुन्हा शेतकºयांच्या नावावर जमा झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता, जवळगाव, नांदगाव, सायगाव, जोगाईवाडी, तटबोरगाव येथील ३३ शेतकºयांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे अर्ज करून कृषी पंपांची विद्युत देयके दुरूस्त करून देण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. या संदर्भात महावितरणचे कार्याकारी अभियंता मंदार वग्यानी यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भातील पाठपुरावा वरिष्ठ कार्यालयाकडे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ग्राहक पंचायत शेतकºयांच्या पाठीशी४महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असतांना नदी, नाले, पाझर तलाव,मध्यम प्रकल्प, साठवण तलाव यातील पाणी सतत तीन वर्षे आरक्षित होते. शासनाने तसे आदेशही काढलेले होते. अशा स्थितीत बंद असलेल्या कृषी पंपाचे विद्युत देयके शेतकºयांच्या माथी मारण्यात आली आहेत.४या संदर्भात कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना तसे पत्र देण्यात आले आहे. विद्युत बिलांची दुरूस्ती न झाल्यास ग्राहक पंचायतच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विभागीय संघटक जनार्धन मुंडे यांनी दिला आहे. असे असले तरी वीज मंडळाने वाढीव बिले देऊन शेतकºयांना अडचणीत आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.४तालुक्यातील ३३ शेतकºयांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे अर्ज करुन कृषी पंप बिले दुरुस्तीची मागणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmbajogaiअंबाजोगाईmahavitaranमहावितरणMONEYपैसाagricultureशेती