शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

दिवसभर उमेदवारांनी घेतला झालेल्या मतदानाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:43 PM

जवळपास दीड-दोन महिन्यांपासून प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवारांनी २१ आॅक्टोबर रोजी मतदान संपल्यानंतर नि:श्वास टाकला.

बीड : जवळपास दीड-दोन महिन्यांपासून प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवारांनी २१ आॅक्टोबर रोजी मतदान संपल्यानंतर नि:श्वास टाकला. मतदानाच्या दिवशी म्हणजे २२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या दिनचर्येचा आढावा घेतला तेव्हा अनेक जण मतदानाचा आढावा घेण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिवसभर आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या परळीत गाठीभेटी घेऊन झालेल्या मतदानावर चर्चा केली. तसेच त्यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून तेथील माहिती घेतली. आज ते परळीतील निवासस्थानातील संपर्क कार्यालयातच होते.बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंगळवारी दिवसभर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी दिलखुलास चर्चा केली. त्यांच्या चेहºयावर निवडणूक निकालाचा अजिबात ताण, चिंता दिसत नव्हती. पत्रकारांशीही मनमोकळेपणाने चर्चा केली.परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ह्या मंगळवारी दिवसभर त्यांच्या परळीतील यशश्री बंगल्यावर होत्या. सकाळी त्यांना भेटण्यास आलेल्या मतदारसंघातील सरपंच, बूथ प्रमुख, विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली व झालेल्या मतदानाची माहिती घेतली.माजलगाव मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी मंगळवारी सकाळी काही वेळ आराम केला व काही वेळ मतदार संघातील व गावातील लोक भेटायला येत होते त्यांच्या बरोबर घालवला. मला ज्यांनी मतदारसंघात मोलाचे सहकार्य केले, असे शिवाजी रांजवण यांचे वडील सोनाजीराव रांजवण यांचे निधन झाल्याने दुपारनंतर माजलगाव येथे त्यांच्या अंत्यविधीला गेलो, असे रमेश आडसकर यांनी सांगितले.आष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ भिमराव धोडे हे त्यांच्या मंगळवारी आष्टी येथील संपर्क कार्यालयात उपस्थित होते. मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते भेटायला येत होते. त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर मतदानाविषयी सखोल चर्चा केली. आणि आपणच निवडणूक जिंकणार असल्याचे ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे हे मंगळवारी दिवसभर संपर्क कार्यालयात उपस्थित होते. झालेल्या मतदानाविषयी कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होते. त्यांनाही आपणच विजयी होणार असा विश्वास होता.मतदान संपल्यानंतर आज मंगळवारी नित्यनियमाप्रमाणे श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. जनसंपर्क कार्यालयात जाऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी मतदान प्रक्रि येवर चर्चा केली. पहिल्याप्रमाणे सुरळीतपणे जनसेवेचे कार्य सुरु ठेवले, असे केज मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी सांगितले.मंगळवारचा संपूर्ण दिवस आमच्या केज विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी चर्चेत गेला. मतदार संघातून अनेक ज्येष्ठ सहकारी आज चर्चेसाठी उपस्थित होते. निवडणुकीतील घडामोडीवर चर्चा झाली.आज दिवसभर भेटायला आलेल्या व स्वत: फोन करु ण अनेक सहकारी बंधु, भगिनी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले, केज मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनीसांगितले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण