आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन करा; बाळासाहेब आजबे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी- A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:23+5:302021-03-07T04:30:23+5:30

आष्टी : आष्टी तालुका बार असोसिएशन व तालुक्यातील सामान्य जनतेची अनेक दिवसांपासून आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन व्हावे, अशी ...

Establish a Sessions Court at Ashti; Balasaheb Ajbe's demand to the Chief Minister-A | आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन करा; बाळासाहेब आजबे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी- A

आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन करा; बाळासाहेब आजबे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी- A

आष्टी : आष्टी तालुका बार असोसिएशन व तालुक्यातील सामान्य जनतेची अनेक दिवसांपासून आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन व्हावे, अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे समक्ष भेटून केली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले असल्याचे बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यामध्ये १२२ ग्रामपंचायती व ५५ वाड्या-वस्त्या तांडे आहेत. तसेच जिल्ह्याचे ठिकाण हे आष्टी शहरापासून १०० किलोमीटर तर आष्टी तालुक्यातील शेवटचे गाव १३० ते १४० किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत पक्षकारांना सत्र न्यायालयातील कामासाठी बीड येथे जाणे गैरसोयीचे होते. सत्र न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या फायलिंगसुद्धा आष्टी न्यायालयात होत आहेत व आष्टी येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे व लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आजबे यांनी केली आहे. याबाबत लवकरच योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे आमदार आजबे यांनी सांगितले.

Web Title: Establish a Sessions Court at Ashti; Balasaheb Ajbe's demand to the Chief Minister-A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.