शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

अंबाजोगाईत मराठी विद्यापीठ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:05 PM

अंबाजोगाई (जि. बीड) येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात गेली दोन दिवस सुरू असलेल्या बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. तमाम रसिकांच्या साक्षीने अंबाजोगाईत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून अंबाजोगाई आणि उदगीर या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करावी, असा ठराव संमत करण्यात आला.

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप १२ ठराव संमत

सतीश जोशीअंबाजोगाई (जि. बीड) : येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात गेली दोन दिवस सुरू असलेल्या बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी रात्री उशिरा झाला. तमाम रसिकांच्या साक्षीने अंबाजोगाईत मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून अंबाजोगाई आणि उदगीर या जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करावी, असा ठराव संमत करण्यात आला.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, दादा गोरे, दगडू लोमटे, संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, अमर हबीब, रामचंद्र तिरुके, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, भावना राजनौर, व्यंकटेश गायकवाड, किरण सगर, भास्कर बडे आदी उपस्थित होते.

या संमेलनात १२ ठराव संमत करण्यात आले. विविध क्षेत्रांतील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेती खर्चावर आधारित पिकांंना हमी भाव देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, लातूर-मुंबई, धर्माबाद-मुंबई या मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण करून परळी-बीड-नगर हा होऊ घातलेला रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, सर्वेक्षण झालेल्या घाटनांदूर-श्रीगोंदा या रेल्वेमार्गास मान्यता देऊन अंमल करावा, दासोपंतांचे साहित्य शासनाने प्रकाशित करावे, अंबाजोगाईस पर्यटनाचा ‘अ’ दर्जा द्यावा, मसापसाठी अंबाजोगाई पालिकेने जागा द्यावी, यासह मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत स्थापन करण्याचा आणि उदगीर, अंबाजोगाई नव्या जिल्ह्यांची निर्मिती करावी, असे ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आले.

स्वागताध्यक्ष सभापती राजेसाहेब देशमुख यांनी हे संमेलन यशस्वी करणाºयांचे आभार मानले. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या भाषणात साहित्याच्या निर्मितीबद्दल भाष्य केले. मराठी लेखकात आत्मनिष्ठा नाही. जे साहित्य ते निर्माण करतात, त्याचे अनुकरण वास्तविक जीवनात नसते, असे ते म्हणाले. बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन