वसंतदादा पाटील महाविद्यालयांत वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:26+5:302021-01-08T05:48:26+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बळीराम राख होते. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि स्व. केशरबाई क्षीरसागर यांच्या प्रतिमांचे पूजन व ...

वसंतदादा पाटील महाविद्यालयांत वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बळीराम राख होते. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि स्व. केशरबाई क्षीरसागर यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. किशोर मचाले, पदव्युत्तर विभाग संचालक प्रा. डॉ. मनोजकुमार प्रकाश, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. ज्योती क्षीरसागर यांनी केले. स्पर्धेत आयेशा शेख, शीतल जावळे, प्राजक्ता काळे, पंचगंगा वाघिरे, शिफा मोमीन या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अध्यक्षीय समारोप डॉ. राख यांनी केला.
महाविद्यालयाच्या सावित्रीबाई फुले महिला सक्षमीकरण समिती व अंतर्गत तक्रार कक्षामार्फत ‘मी सावित्री बोलतेय’ या विषयावर सदरील वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रेखा मुळे यांनी केले, तर आभार प्रा. अर्चना चवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अनिता धारासूरकर, डॉ. पल्लवी इरलापल्ले, प्रा. मंजूषा कुलकर्णी, प्रा. विमल अलापुरे, प्रा. मनीषा पाडिया, प्रा. डॉ. सय्यद शानूर, डॉ. प्रकाश गायकवाड, प्रा. प्रदीप मांजरे आदींनी परिश्रम घेतले.