धारूरची अकरा गावे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:00+5:302021-05-25T04:37:00+5:30

धारूर : तालुक्यात दहापेक्षा जास्त रुग्ण असणारी अकरा गावे कोरोनाचे हॉटस्पाॅट बनली आहेत. नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी या ...

Eleven villages of Dharur are 'hotspots' of Corona. | धारूरची अकरा गावे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

धारूरची अकरा गावे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

धारूर : तालुक्यात दहापेक्षा जास्त रुग्ण असणारी अकरा गावे कोरोनाचे हॉटस्पाॅट बनली आहेत. नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी या गावात भेटी देऊन जनजागृती केली व आवश्यक सूचना केल्या.

तालुक्यातील या अकरा गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन स्वामी यांनी केले. सर्व नागरिकांनी दक्षता बाळगावी, तसेच गावातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्ष राहण्याबाबत त्यांनी सूचना केली. तालुक्यातील सोनीमोहा येथे ३०, चोंडी येथे १६, बोडखा येथे ३४, कोयाळ येथे २०, कांदेवाडीत १८, देवदहिफळ ३३, आसरडोह १५, मैंदवाडीत ४५, रुई धारूर येथे १५, वाघोली १८ व धारूर शहरात १०८ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व गावांनी कोरोनाबाबत पूर्णपणे दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Eleven villages of Dharur are 'hotspots' of Corona.