संत तुकोबाराय मंदिरास अकरा हजार फुलांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:18+5:302021-07-21T04:23:18+5:30
अकरा हजार फुलांच्या सजावटीसाठी लागणारी फुले सोनिजवळा येथील हनुमंत गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे गर्दी होणार नाही याची काळजी ...

संत तुकोबाराय मंदिरास अकरा हजार फुलांची आरास
अकरा हजार फुलांच्या सजावटीसाठी लागणारी फुले सोनिजवळा येथील हनुमंत गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घेत मंदिर प्रशासनाने शासकीय नियम न मोडता आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला. मंदिरातील फुलांची सुरेख सजावट महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल महाराज, अशोक महाराज, जनार्दन महाराज, हनुमंत महाराज शिरसट, गणपत पांचाळ, तुकाराम कापसे, पारेकर बप्पा यांनी केली.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठोबाचे दर्शन व्हायचे परंतु, कोरोनामुळे मागच्या वर्षीपासून दर्शन नाही. यामुळे मनाला हुरहूर वाटत आहे. आषाढीनिमित्त श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे फुलांची आरास करून मंदिर सजावट व अभिषेक सोहळा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संपन्न केला.
महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री
अध्यक्ष, संत तुकोबाराय पावनधाम संस्थान
200721\183-img-20210720-wa0015.jpg~200721\184-img-20210720-wa0011.jpg
आषाढी एकादशी निमित्त संत तुकोबाराय मंदिरास अकरा हजार फुलांनी सजविण्यात आले होते.~आषाढी एकादशी निमित्त संत तुकोबाराय मंदिरास अकरा हजार फुलांनी सजविण्यात आले होते यावेळी हभप महादेव महाराज बोराडे.