उपोषणानंतर मिळाले वीज कोटेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:46+5:302021-02-25T04:41:46+5:30
धारूर : महावितरण कडे कागदपञाची पूर्तता करून कनेक्शनसाठी चकरा मारूनही कोटेशन मिळत नसल्याने तालुक्यातील गांजपूर येथील वयोवृध्द शेतकरी ...

उपोषणानंतर मिळाले वीज कोटेशन
धारूर : महावितरण कडे कागदपञाची पूर्तता करून कनेक्शनसाठी चकरा मारूनही कोटेशन मिळत नसल्याने तालुक्यातील गांजपूर येथील वयोवृध्द शेतकरी बाबूराव सिरसट यांनी तहसील कार्यालया समोर उपोषण सुरू केले होते. याप्रकरणी किसान सभेनेपाठपुरावा करून कोटेशन मिळवून दिले. सहा महिन्यानंतर या वृध्द शेतकऱ्यांला कोटेशन मिळाले. त्यानंतर त्याने हे उपोषण मागे घेतले.
परळीत गरजुंना ब्लँकेटचे वाटप
परळी : शहरातील अन्नपूर्णा चारिटेबल ट्रस्ट येथे गरीब व गरजुंना ब्लँकेटसह अन्नदानाचे वाटप करण्यात आले. श्रीकांत चाटे व अर्चना श्रीकांत चाटे यांनी शनिवारी हा उपक्रम राबविला. उबदार ब्लँकेट मिळाल्यामुळे गरीब, गरजू महिला व पुरुषांचा आनंद द्विगुणीत झाला.
गटारी तुंबल्याने दुर्गंधी
बीड : शहरातील डी. पी. रोड सुभाष रोड, कांजा, जुनी भाजी मंडई, बुंदेलपुरा भागात गटारी तुंबल्याने पादचाऱ्यांना दुर्गठधीचा सामना करावा लागत आहे. नजर पालिकेने गटारींची नियमित सफाई करून जागोजागी साचलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.
वाहतुकीची कोंडी
बीड : शहरातील डॉ. आंबेडकर चौक, हिरालाल चौक, जुन मोंढा व कंकालेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेशिस्तपणामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. वळणाचे नियम धाब्यावर बसवित कुठेही- कधीही वाहने चालविली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.