जाफराबादेत निसर्गाच्या कोपानंतर बळीराजाला वीजकंपनीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:20 PM2020-02-24T23:20:06+5:302020-02-24T23:21:17+5:30

वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.

Electricity company 'shock' to Jaffarabad | जाफराबादेत निसर्गाच्या कोपानंतर बळीराजाला वीजकंपनीचा ‘शॉक’

जाफराबादेत निसर्गाच्या कोपानंतर बळीराजाला वीजकंपनीचा ‘शॉक’

Next
ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरवर लागवड : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रबीची पिके धोक्यात

जाफराबाद : वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यावर्षी जाफराबाद तालुक्यात १८ हजार ७०० हेक्टरवर रबी हंगामाची पेरणी झाली. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही. निसर्गाच्या कोपानंतर शेतकऱ्यांना महावितरण एक प्रकारचा ‘शॉक’ देत असल्याचे दिसत आहे.
पूर्णा, धामना, केळणा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये यावर्षी सर्वाधिक रबीची पेरणी झाली. चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पिके चांगली आली. सध्या रबी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज आहे. परंतु, महिन्याभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. १० मिनिंटाला लाईट जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.
महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी असतानाही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील रबी हंगाम धोक्यात आला असून, शेतकरी चिंतेत सापडले आहे. निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हैराण झाल्याने शेतक-यांना महावितरण ‘शॉक’ देत आहे.
कृषी पंपांना शासनाने भारनियमन ठरवून दिले आहे. अधिका-यांनी शासनाच्या भारनियमां व्यतिरिक्त अधिकचे भारनियमन सुरू केले आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी नियोजन न करता आपल्या सोयीनुसार काम करीत असल्याचा आरोप शेतक-यांकडून होत आहे. याबाबत अभियंता डब्ल्यू. आर. गांधीले यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
लागवड : उसाच्या क्षेत्रात वाढ
यावर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार १८ हजार ७०० हेक्टरवर पेरण्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात रबीच्या पिकाची लागवड जवळपास २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे.
पाऊस चांगला असल्याने यावर्षी शाळू ज्वारीची पेरणी ५ हजार ६२४, मका २ हजार ४०२, गहू ३ हजार ४३६, हरबरा ७ हजार २३६, करडई १० एकरवर पेरणी करण्यात आली आहे. या शिवाय तालुक्यात उसाच्या क्षेत्रात देखील वाढ होणार असून, सीडस् कांद्याची सुध्दा शेतक-यांनी लागवड केली आहे. परंतु, सध्या पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके हातातून जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Electricity company 'shock' to Jaffarabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.