विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:03+5:302021-01-08T05:47:03+5:30
पाणी उपलब्धतेने रबी पिके जोमात अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिसरातील ...

विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
पाणी उपलब्धतेने रबी पिके जोमात
अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिसरातील विहिरी, इंधन विहिरी, पाझर तलाव व विविध जलस्त्रोत तुडुंब भरले. परिणामी रबी हंगाम मोठ्या प्रमाणात बहरला आहे. हरभरा, गहू, ज्वारी, करडई ही पिकेही चांगली आली असून परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसू लागले आहे. यावर्षी तरी समाधानकारक उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
साहित्याचे ढिगारे वाहतुकीला अडथळा
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण ते टाकरवण फाटा रस्त्याच्या कडेला टाकलेले खडीचे ढिगारे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ढिगाऱ्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात होऊ लागले आहेत. एक तर रस्ता दुरूस्त करा किंवा रस्त्याच्या बाजूला टाकलेली खडी उचला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ढिगारे टाकण्यात आले, मात्र, अद्यापही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रस्ता दुरुस्त करून ढिगारे उचलण्याची मागणी आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.