शिव अंगणवाडी सेना मराठवाडा प्रमुखपदी दिलीप भोसले यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST2021-09-02T05:12:39+5:302021-09-02T05:12:39+5:30

दिलीप भोसले यांनी मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाशी दोन हात केलेले आहेत. आंदाेलन, निदर्शने, उपोषणे करून त्यांना ...

Election of Dilip Bhosale as Shiv Anganwadi Sena Marathwada Chief | शिव अंगणवाडी सेना मराठवाडा प्रमुखपदी दिलीप भोसले यांची निवड

शिव अंगणवाडी सेना मराठवाडा प्रमुखपदी दिलीप भोसले यांची निवड

दिलीप भोसले यांनी मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाशी दोन हात केलेले आहेत. आंदाेलन, निदर्शने, उपोषणे करून त्यांना न्याय मिळवून दिला. याचीच दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष सारिका सावंत यांनी भोसले यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी दिली आहे. आतापर्यंत जसे काम केले, तसेच प्रामाणिक काम यापुढेही करत राहू, असा विश्वास भोसले यांनी दिला आहे. हिंगोली, नांदेड, बीडचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, आप्पासाहेब जाधव, बदामराव पंडित, बाळासाहेब आंबुरे, योगेश क्षीरसागर, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, अरूण डाके, सचिन मुळूक, संगीता चव्हाण आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.

010921\01_2_bed_20_01092021_14.jpeg

दिलीप भोसले

Web Title: Election of Dilip Bhosale as Shiv Anganwadi Sena Marathwada Chief