२० ग्रामपंचायतींसाठी २५ फेब्रुवारीला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:40 IST2018-01-24T23:40:34+5:302018-01-24T23:40:41+5:30
बीड : मार्च ते मे - २०१८ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ...

२० ग्रामपंचायतींसाठी २५ फेब्रुवारीला निवडणूक
बीड : मार्च ते मे - २०१८ मध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २० ग्राम पंचायातींसाठी २५ फेब्रुवारी २०१८ रोजी मतदान होणार आहे. यासोबतच ज्या ग्रामपंचायतीमधील पदे काही कारणास्तव रिक्त झाली आहेत, अशा ठिकाणी देखील २५ फेब्रुवारी रोजीच पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्राम पंचायतींमध्ये २२ जानेवारी रोजी रात्री १२ वाजतापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
सदर निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १२ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. वैध उमेदवारांना १५ फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १५ फेब्रुवारी रोजीच चिन्ह वाटपही होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालवधीत मतदान होणार असून २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.