मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाच्या सवलती द्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:18+5:302021-06-28T04:23:18+5:30

अंबाजोगाई : धनगर समाजाला ज्याप्रमाणे राजकीय आरक्षणाव्यतिरिक्त एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती मिळतात, त्याचप्रमाणे आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला ...

Educational reservation concessions should be given to the Maratha community till the demand is met | मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाच्या सवलती द्याव्यात

मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाच्या सवलती द्याव्यात

अंबाजोगाई : धनगर समाजाला ज्याप्रमाणे राजकीय आरक्षणाव्यतिरिक्त एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती मिळतात, त्याचप्रमाणे आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाच्या सर्व सवलती मिळाव्यात, अशी आपली भूमिका असल्याचे खा. प्रीतम मुंडे यांनी नमूद केले. अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमास आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

खा. मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पूर्ण समर्थन असून, आरक्षण निश्चितच मिळायला हवे अशी भूमिका मांडली. जेव्हा मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळी लोकसभेत सर्वप्रथम हा मुद्दा मांडणारी मी महाराष्ट्रातील पहिली खासदार होते. आतापर्यंत तीन वेळा मी मराठा आरक्षणासाठी लोकसभेत बोलले आहे. यापुढेही मराठा समाजाच्या लढ्यात आमचे पूर्ण योगदान राहील. धनगर समाजाला राजकीय आरक्षणाव्यतिरिक्त एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती मिळतात. त्याचप्रमाणे आरक्षण जेव्हा मिळायचे ते मिळेल; परंतु मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाच्या सवलती ताबडतोड देण्यात याव्यात, अशी आमची भूमिका असल्याचे खा. मुंडे यांनी स्पष्ट केले.

दोन्ही मागण्या भिन्न, आमचा पाठिंबा

‘ओबोसी’चा लढा राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे यासाठी आहे, तर मराठा समाजाचा लढा शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाच्या मागणीसाठी आहे. दोन्ही मागण्या भिन्न आहेत आणि या दोन्हीलाही आमचा सर्व ताकदीनिशी पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे.

Web Title: Educational reservation concessions should be given to the Maratha community till the demand is met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.