सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:45 IST2019-03-04T23:44:46+5:302019-03-04T23:45:58+5:30
तालुक्यातील खर्डेेवाडीत बेरोजगारीला कंटाळून युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या
बीड : तालुक्यातील खर्डेेवाडीत बेरोजगारीला कंटाळून युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
महादेव भोसले (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महादेव हा बेरोजगारीमुळे चिंतेत होता. अनेक दिवसांपासून काही उद्योग व्यवसाय सुरु करता येईल का, कुठे नोकरी मिळेल का, व्यवसायासाठी कुठली बँक कर्ज देईल, का याची चाचपणी तो करत होता. मात्र सगळीकडे अपयश आल्यानंतर खचून जाऊन सोमवारी पहाटे त्याने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. याप्रकरणाची नोंद करणे सुरू असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.