खाद्यतेलाची उसळी, शेंगदाण्याची उडी, शेवगा उतरला, डाळिंब चढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:40+5:302021-02-08T04:29:40+5:30
///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////))))) किराणा बाजारात शांतता : टोमॅटो ...

खाद्यतेलाची उसळी, शेंगदाण्याची उडी, शेवगा उतरला, डाळिंब चढला
///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता.///////////////////////////////)))))
किराणा बाजारात शांतता : टोमॅटो १०, तर कोबी ५ रुपये किलो
बीड : बजेटनंतर खाद्यतेलाचे भाव नियंत्रणात राहतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा बजेट जाहीर झाल्यानंतर फोल ठरली. सरत्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दराने किरकोळ घसरणीनंतर पुन्हा उसळी मारल्याने सर्वसामान्यांसाठी फोडणी महाग बनलेली आहे. भाजी बाजारात आवक समाधानकारक असल्याने भाज्यांचे दर सर्वसाधारणच होते. फळांच्या बाजारात मात्र डाळिंबाने चांगलाच भाव खाल्ला असून, त्याची विक्री २०० रुपये किलो दराने केली जात आहे.
संक्रांतीपासून किराणा बाजारात ग्राहकी शांतच आहे. खाद्यतेल, शेंगदाणे, गहू आणि तांदळात तेजीचे वारे होते, तर डाळींचे भाव स्थिर होते. साखर, गुळाचे भाव समान ३५ रुपये किलो होते. कोलम आणि बासमती तांदळाचे भाव किलाेमागे ५ ते १० रुपयांनी वधारले. सुकामेव्याला ग्राहकी नव्हती. नवा गहू येण्यास अवधी आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने गव्हाच्या दरात क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली आहे.
फळांच्या बाजारात कलिंगड, खरबूज, तसेच आंब्यांची आवक होत आहे. काश्मीरच्या डिलक्शन सफरचंदाची आवक घटल्याने सध्या परदेशी सफरचंदाची आवक सुरू आहे. तासगाव, सोलापूर भागातून द्राक्षांची आवक वाढत आहे. अननसालाही चांगली मागणी आहे. थंडीमुळे भेंडीला फटका बसल्याने उगवण कमी झाल्याने आवक घटली आहे. मात्र, शेवग्याची मोठी आवक होत आहे. टोमॅटो, कांदे, बटाट्यांचे भाव साधारण आहेत. उन्हामुळे कोथिंबीर पिवळी पडत असून, भाव तेजीत आहेत. लिंबाची मागणी असली तरी आवक कमी असल्याने भाव वधारले आहेत. भाजी, किराणा आणि फळ बाजारात मात्र ग्राहकी साधारणच होती.
------
तेलाचा भडका सुरूच
एक लिटर सूर्यफूल तेल १३५ वरून ५ रुपयांनी घटले व पुन्हा १० रुपयांनी वाढले. सोयाबीन तेल १२५ वरून ७ रुपयांनी कमी झाले व पुन्हा १२ रुपयांनी वाढले. शेंगदाणे १० रुपयांनी वाढले, भाव ११० रुपये होता. गहू २,७५० रुपये झाला. कोलम तांदळाचे भाव किलोमागे १० रुपये, तर बासमती तांदूळ ५ ते १० रुपयांनी वधारला.
----
कोथिंबीर, लिंबू तेजीकडे
कोथिंबिरीचा भाव एक रुपयावरून अडीच रुपये झाला, तर एक रुपयाचा लिंबू २ रुपयांना मिळत आहे. आवक वाढल्याने शेवग्याचे भाव ३० ते ४० रुपये किलोे होते. कांदे ३०, तर बटाटे २० रुपये किलो होते. कोबी ५ रुपये, भेंडी ४०, दोडके आणि वांगी ३० रुपये किलो होते. मटार शेंग ३० रुपये, तर गाजराचे भाव ४० रुपये किलो होते.
------
///////////////////पंढरपूरच्या बाजारातून भगवा डाळिंबाची आवक होत असून, भाव १,८० ते २,०० रुपये किलो होता./////////////////////////////// मोसंबी ६०, तर द्राक्ष ७० ते ८० रुपये किलो होते. लालबाग, बदाम आंबे १५० रुपये किलो होते. पपईचा भाव मात्र १० रुपये किलो होता. परदेशी सफरचंद १५० ते १८० रुपये होते.
---------------
कुठलेही सामाजिक कार्यक्रम, सप्ताह, तिथी नसल्याने किराणा बाजारात केवळ महिनावारीचे ग्राहक आहे. उठाव कमी आहे.
-गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी
-------
भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने भाव कमीच आहेत. फक्त भेंडी, हिरवी मिरचीचे भाव वाढले, बाकी सर्व स्वस्त आहेत. -कैलास काळे, भाजी विक्रेता
----
डाळिंबाची आवक अत्यंत कमी व मागणी जास्त असल्याने कॅरेटचे भाव जास्त आहेत. अन्य फळांची आवक साधारण आहे. कलिंगड, खरबुजाला मागणी कमी आहे.
-एकबाल बागवान, फळविक्रेता