शिरूर कासारमध्ये भाजपत नाराजीचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:26+5:302021-07-11T04:23:26+5:30
...... पिकांसाठी फवारे दुरुस्तीची लगबग शिरूर कासार : दोन दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने कपाशी पिकावर कीड नियंत्रणासाठी ...

शिरूर कासारमध्ये भाजपत नाराजीचे पडसाद
......
पिकांसाठी फवारे दुरुस्तीची लगबग
शिरूर कासार : दोन दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने कपाशी पिकावर कीड नियंत्रणासाठी औषध फवारणीची गरज आहे. यामुळे फवारणी यंत्राची दुरुस्ती करून घेतली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. कपाशी चांगली उगवल्याने अनेक ठिकाणी अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फवारणीची लगबग सुरू आहे.
....
शाळेबाबत अभिप्राय मोहीम
शिरूर कासार : शाळा १५ तारखेपासून सुरू होण्याचे सांगितले जात आहे. शाळा सुरू कराव्यात काय? याबाबत शिक्षण विभागाने शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्याकडून अभिप्राय मागविले आहेत. शाळा सुरू करण्याबाबतचा आपला अभिप्राय द्यावा, असे आवाहन गटशिक्षण अधिकारी शेख जमीर यांनी केले आहे.
....
चिखलात रुतले बसस्थानक
शिरूर कासार : येथील बसस्थानक तालुक्याच्या ठिकाणचे बसस्थानक आहे. अद्यापपर्यंत येथे डांबरीकरणाचे काम झाले नसल्याने जाण्या-येण्याच्या रस्त्यासह परिसरात चिखल होत आहे. येथे रोज येणाऱ्या प्रवाशांना हे त्रासाचे ठरत आहे. बसस्थानकात डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
....
कापसाला युरियाची मात्रा
शिरूर कासार : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर तालुक्याच्या अनेक गावांत दोन दिवसांत पुरेसा पाऊस झाला आहे. आता शेतकरी कापसाला युरिया खताची मात्रा टाकत आहेत. झाडाभोवती युरियाची रांगोळी घालताना दिसून येत आहेत. दरम्यान, थोड्याच पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्य पेरण्या केल्या होत्या. पिकेही चांगली उगवली होती. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकरी पिकांना खतांची मात्रा देताना दिसत आहेत.
100721\img20210710152247.jpg
फोटो