शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या सावरगावातील सभेला प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 19:11 IST

मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले.

बीड - मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. तर तिकडे महंत नामदवेशास्त्रींच्या विरोधानंतर भगवानगडाची गर्दी ओसरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भगवान गडाची नाळ तुटली; आता बाबांचे जन्मस्थळ हेच समाजाचे शक्तीस्थान, असेही प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

एरवी दसऱ्याला भक्तांनी फुलुन जाणाऱ्या भगवानगडावर नेहमीसारखी गर्दी पाहायला मिळाली नाही. यंदा ते चित्र उलट पाहायला मिळालं. यंदा भगवानगडावर शुकशुकाट पाहायला मिळाला, तर सावरगावात पंकजा मुंडे यांच्या सभेला प्रचंड जनसागर लोटला या मेळाव्याला महादेव जानकर, राम शिंदे यांच्यासह पंकजा मुंडेंचे अनेक समर्थकही हजर होते.

महंत नामदेवशास्त्रींनी भगवानगडावर दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांना विरोध केल्यानंतर, पंकजा मुंडेंनी यंदाचा दसरा मेळावा भगवानगडाच्या जन्मगावी म्हणजे बीडमधील सावरगावात घेण्याचा निर्णय घेतला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी समजाबांधवांना भावनिक साद देत त्यांना सर्वांगीण विकासाचे आश्वासनही दिले.

नामदेव शास्त्रींचा पंकजांना विरोधपंकजा मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्रींना पत्र लिहून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र नामदेव शास्त्री त्यांच्या भूमिकेवर ठाम असून भगवान गडावर राजकीय भाषण करण्यास त्यांचा तीव्र विरोध केला होता.

प्रशासनानेही परवानगी नाकारलीपंकजा मुंडे समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र पोलिसांचा गोपनीय अहवाल आणि अर्जदाराकडे विश्वस्तांचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा