चोरट्यांचा लॉकडाऊन फंडा; बिअरबार आणि परमीट रूमकडे वळवला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:39 PM2020-04-30T18:39:45+5:302020-04-30T18:55:34+5:30

अंबाजोगाईत गोडाऊनचे  शटर उचकटून सव्वा लाख रूपयाची दारू  चोरीस

During the lockdown, thieves marched to the beer bar and permit room | चोरट्यांचा लॉकडाऊन फंडा; बिअरबार आणि परमीट रूमकडे वळवला मोर्चा

चोरट्यांचा लॉकडाऊन फंडा; बिअरबार आणि परमीट रूमकडे वळवला मोर्चा

googlenewsNext

अंबाजोगाई-: तळीरामांची मोठी  मागणी लक्ष्यात घेऊन चोरांनी आपला मोर्चा आता बिअरबार व परमीट रूमकडे वळवीला आहे.चोरीच्या दारू व बिअरच्या बाटल्या चढ्या दराने विक्री करून लाखो रूपये कमविण्याचा फंडा शोधून काढला आहे. 

दारूच्या गोडाऊनचे शटर उचकटून अंदाजे सव्वा लाख रूपये किंमतीच्या विविध कंपन्यांच्या विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्यांची चोरी केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील पोखरी रस्त्यावर असलेल्या पॅराडाईज परमीट रूम मध्ये बुधवारी दि.२९ मध्यरात्री  रात्री घडली.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांना प्राप्त झाले असून याप्रकरणी तीन अज्ञात आरोपीविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.हे चोर अंदाजे पंचेवीस ते तीस वयोगटातील आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीतही चोरीच्या घटना शहर आणि तालुक्यात घडत असल्याचे समोर आले आहे.कांही दिवसांपूर्वी चतुरवाडी शिवारात असलेल्या राहुल बिअरबारचे शटर वाकवून पन्नास हजार रूपयाची चोरी झाल्याची घटना घडली होती.त्या घटनेतील आरोपींचा छडा लावण्याच्या आतच  बुधवारी दि.२९ दुस-या बिअर बार व परमीट रूम गोडाऊनमध्ये चोरीची घटना  घडली आहे.सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने व्यावसायिक व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरापासून काही अंतरावर असलेल्या पोखरी रस्त्यावर न्यु  पॅराडाईज बिअर बार परमीट रूम व  गोडाऊन आहे.बुधवारी मध्यरात्री अज्ञात तीन चोरांनी सील केलेल्या या बिअर बार व परमीट रूमचे कुलुप कोयंडा तोडून व शटर उचकटून आत प्रवेश केला.काऊंटरवर असलेल्या त्याचप्रमाणे गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेल्या विविध विदेशी कंपन्यांचे दारूचे बाॅक्स तसेच बिअरच्या बाटल्या चोरांनी चोरी केल्या. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.याप्रकरणी हंसराज कमलाकर देशमुख यांच्या फिर्यादीवरून तीन आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक संदीप दहीफळे अधिक तपास करत आहेत. 

चोरट्यांचा नवा फंडा

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. त्याचप्रमाणे संचारबंदी ही लागू आहे. फक्त जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यात आलेली आहेत. यामुळे  तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. सर्वत्र बियर बार व परमिट रूम बंद करून ते राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील   करण्यात आलेली आहेत. परिणामी तळीरामांना दारू व बियर उपलब्ध होताना दिसत नाही. करिता चोरांनी परिस्थितीचा फायदा घेऊन  बिअर बार परमिट रूमकडे मोर्चा वळवला आहे . चोरी करून चढ्या भावाने  विक्री करून लाखो रुपये कमावण्याचा नवा फंडा चोरांनी शोधून काढला आहे.

Web Title: During the lockdown, thieves marched to the beer bar and permit room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.