वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:18 IST2018-02-14T01:18:21+5:302018-02-14T01:18:26+5:30
परळी : ‘प्रभू वैद्यनाथ बप्पा की जय’, ‘हर हर महादेव’च्या जय घोषात लाखो भाविकांनी महाशिवरात्रीच्या पर्वकाळात श्री वैद्यनाथाचे दर्शन ...

वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
परळी : ‘प्रभू वैद्यनाथ बप्पा की जय’, ‘हर हर महादेव’च्या जय घोषात लाखो भाविकांनी महाशिवरात्रीच्या पर्वकाळात श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले. वैद्यनाथ महाशिवालय सोमवारी रात्री रात्री बारा वाजल्या पासुनच भक्तांच्या गर्दीने गजबजले होते. मंदिर परिसरात योग्य नियोजन केल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले. परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील सोमेश्वराची पालखी मिरवणुकीचे दुपारी शहरात आगमन झाले.
मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त परळी येथे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी देशाच्या कानाकोपºयातून भाविकांचा जनसागर उसळला होता. सोमवारी रात्री १२ नंतर व मंगळवारी पहाटेच्या दरम्यान वैद्यनाथ मंदिराच्या पायºयांवर, रस्त्यावर दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली होती. सनई चौघडा वादनाने वातावरण प्रसन्न बनले होते. धर्म दर्शनासाठी चार तास लागले, असे उत्तर प्रदेशहुन आलेले भाविक शिवम पांडे यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील लखनऊ मधील लखीमपुर जिल्ह्यातील वृध्द भाविक केदारनाथ पांडे, माधुरी देवी पांडे, प्रभा पांडे हे महाशिवरात्रीचे श्री वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी तीन दिवसापासुन परळीत दाखल झाले होते. वैद्यनाथाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल्याचे पांडे कुटुंबियांनी सांगितले. पुण्याच्या नवी सांगवी भागातील जे.जी.साईल यांनीही प्रभु वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच गुजरात, आंंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडु व अन्य राज्यातुन ही भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने गुजरात मधील भाविकांना श्री प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेता आले. व शिवकथेचा ही लाभ परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लंिग नगरीत घेता आला हे आमचे भाग्यच आहे, असे गुजरात येथील भाविक जगदिशभाई खाटुवाला यांनी सांगितले. ट्रस्टने मंदिराच्या पायºयांवर नागमोडीलोखंडी बॅरीकेट्स उभारल्याने भाविकांना सुलभ दर्शन घेता आले.
मंदिरात आल्यानंतर शुध्द पाण्याची व्यवस्था ट्रस्टने केली होती. दर्शन मंडपात महिलांसाठी बैठक व्यवस्था केली होती. गाभाºयात व समोर पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे प्रत्येक भाविकांना दर्शन घेणे शक्य झाल्याचे ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.दरम्यान सायंकाळी रुद्राभिषेकाच्या एक तास आधी वरुणराजाने हजेरी लावली. निसर्गानेही वैद्यनाथाला जलाभिषेक केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.