कर्मचा-यांच्या मनमानीमुळे जय महेशचा उतारा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:17 IST2018-02-20T00:17:00+5:302018-02-20T00:17:29+5:30
पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्याचे नुकसान होत असून शेतकºयांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

कर्मचा-यांच्या मनमानीमुळे जय महेशचा उतारा घटला
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याचे कर्मचारी ऊसतोड करण्यासाठी शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. पैसे देणा-या शेतक-यांचा आठ महिन्याचाही ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी जवळपास एक टक्क्यापर्यंत घटली आहे. यामुळे कारखान्याचे नुकसान होत असून शेतकºयांची पिळवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या वर्षीचा ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असतानाही कारखानदार मात्र बाहेरच्या क्षेत्रातील ऊस आणत असल्याने तालुक्यातील शेतकºयांचा ऊस अद्यापही फडातच उभा आहे. जय महेश कारखान्याने आतापर्यंत बाहेरच्या क्षेत्रातील ऊस गाळपासाठी आणल्याने क्षेत्रातील ऊस उभा असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उशीर होत असल्याने ऊस ऊत्पादक शेतकरी कारखानदाराच्या दारात चकरा मारत असून तोड देण्याची मागणी करीत आहेत.
शेतक-यांच्या या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी जय महेश कारखान्याचे कर्मचारी पुढे सरसावले आहेत. या संधीचा फायदा घेत अडचणीत सापडलेल्या शेतक-यांकडे पैशाची मागणी करीत आहेत. जो शेतकरी कर्मचाºयांना पैसे देईल त्याचा जूनमध्ये लावलेला अडसाली उसाची तोड करण्यात येत आहे. ८ महिन्याचा ऊस गाळपासाठी येत असल्याने जय महेश कारखान्याची रिकव्हरी शेवटच्या टप्प्यात वाढण्याऐवजी घटायला सुरुवात झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी कारखान्याची रिकव्हरी ११.३० एवढी होती. आर्थिक तडजोडीतून आठ महिन्याचा ऊस गाळपास आणत असल्याने साखर उतारा कमालीचा घटला आहे. सध्या उतारा १०.४० टक्क्यांपर्यंत आला आहे.
यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जय महेश कारखान्याच्या कर्मचा-यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे.
शेतक-याला भाव न मिळू देण्यासाठी डाव
शासनाच्या नियमाप्रमाणे शेतक-यांना एफ.आर.पी. प्रमाणे भाव देण्याचा नियम आहे. या नियमाप्रमाणे साडेनऊ टक्के पर्यंतच्या रिकव्हरी येणे बंधनकारक आहे. यापुढे जशी रिकव्हरी वाढेल तसा उसाचा भावही वाढवून द्यावा लागतो. रिकव्हरी वाढली तर जास्त पैसे द्यावे लागतील यामुळे कारखान्याच्या उपाध्यक्षाकडून जाणीवपूर्वक रिकव्हरी कमी आणत असल्याचे कारखान्याच्या कर्मचाºयाकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.