शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

बीडमध्ये खऱ्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे तोतया पोलिसाचा वृद्धेस  लुटण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 7:19 PM

खऱ्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा टळला.

बीड : पुढे तपासणी चालू आहे, तुमच्या हातातील अंगठ्या आमच्याकडे द्या, आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी देऊन एका वृद्धाची फसवणूक केली जात होती. मात्र खऱ्या पोलिसामुळे हा प्रयत्न फसला. वृद्धाच्या हातातील अंगठी काढताच त्यांनी झडप घातली. मात्र त्यांना चकवा देत हे चोरटे पसार झाले. खऱ्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा टळला. चोर-पोलिसचा हा थरार मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता नगर रोडवरील चंपावती शाळेसमारे घडला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोह नरेंद्र बांगर हे चंपावती शाळेसमोरून मुलाला  खाऊ आणण्यासाठी जात होते. एवढ्यात त्यांना दुचाकीवर आलेल्या दोन युवकांची हालचाल संशयास्पद वाटली. ते बाजुलाच दबा धरून बसले. या तरूणांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर दुचाकी उभा केली. एक तिथेच उतरला तर दुसरा दुचाकी घेऊन शाळेसमोर गेला. सा.बां.समोरील एकाने एका वृद्धास बतावणी देत समोर पोलिसकडे चला, असे म्हणत हाताला धरले आणि दुसऱ्याकडे नेले. तेथे वृद्धाच्या हातातील अंगठी काढून घेताच बाजुला असलेल्या बांगर यांनी झडप घातली. मात्र एकाने त्याना हिसका देत पळ काढला. ‘पकडा पकडा, चोर चोर’ असे म्हणत त्यांनी नागरिकांना जमा केले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. एक चोरटा बालेपीरकडे तर दुसरा नगर नाक्याकडे पळाला.

दरम्यान, याची माहिती बांगर यांनी तात्काळ नियंत्रण कक्षात दिली. त्यानंतर पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि अमोल धस यांनी धाव घेत परिसर पिंजून काढला. मात्र चोरटे सापडले नाहीत. घटनास्थळावरून चोरट्यांची दुचाकी, लायसन्स आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूकीपासून वृद्ध बचावले शिवाय एक घटनाही टळली.

दोघेही अट्टल गुन्हेगारसापडलेल्या आधार कार्डवरून ते श्रीरामपुर येथील असल्याचे समजले. तेथील पोलिसांना विचारणा केली असता हे दोघेही अट्टल गुन्हेगार असल्याचे समजले. यातील एक आरोपी हा दोन वर्षांपासून श्रीरामपूर पोलिसांना हवा आहे. 

अनोळखी व्यक्तींपासून सावध रहापोलीस किंवा इतर कारणे सांगून आपल्याशी कोणी जवळीक साधत असेल तर सावध रहा. संशयास्पद व्यक्ती वाटल्यास तात्काळ सजग होऊन पोलिसांना संपर्क करा. बतावणी, भुलथापांना बळी पडू नका. नागरिकांनी स्वत: सुरक्षित राहण्याबरोबरच इतरांनाही सतर्क करावे. पळालेल्या दोन्ही चोरट्यांना लवकरच जेरबंद करू, त्यादृष्टीने पथके तपास करीत आहेत.- घनश्याम पाळवदे, पोनि स्थानिक गुन्हे शाखा, बीड

टॅग्स :fraudधोकेबाजीBeedबीडPoliceपोलिस