‘वैद्यनाथ’चा विषय स्वतःवर ओढवून घेणे म्हणजे ‘चोर की दाढी मे तिनका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:55+5:302021-03-13T04:58:55+5:30
भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांचा पलटवार परळी : वैद्यनाथ साखर कारखान्यात १० मार्चला झालेल्या प्रकारात पालकमंत्री अथवा अन्य ...

‘वैद्यनाथ’चा विषय स्वतःवर ओढवून घेणे म्हणजे ‘चोर की दाढी मे तिनका’
भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांचा पलटवार
परळी : वैद्यनाथ साखर कारखान्यात १० मार्चला झालेल्या प्रकारात पालकमंत्री अथवा अन्य कोणाही व्यक्तीचे नाव आम्ही घेतले नसताना हा सर्व प्रकार स्वतःवर ओढवून घेण्याचा राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाचा प्रयत्न म्हणजे ‘चोर की दाढी में तिनका’ असाच आहे, असा पलटवार भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केला आहे.
वैद्यनाथ साखर कारखान्यात आज दुपारी काही मद्यपी कर्मचाऱ्यांनी पगारावरून धुडगूस घातला व इतर काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी पत्रक काढून स्वतःचे हसे करून घेतले आहे. कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या दीड वर्षाच्या पगाराचा विषयच येत नाही, कारण मागील हंगामात कारखाना सुरू नव्हता आणि यंदा सुरू होऊन चारच महिने झाले. पगारापोटी सर्वांना ॲडव्हान्स रक्कम देऊन पगार देण्याचा निर्णय झाला, याला सर्व कर्मचारी ९९ टक्के तयार झाल्यानंतर केवळ त्याचे श्रेय प्रशासनाला जाऊ नये म्हणून काही कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन गोंधळ घातला. यात आम्ही पालकमंत्री किंवा अन्य कोणाचेही नाव घेतले नाही, असे असताना हा सर्व प्रकार राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी स्वतःवर व त्यांच्या नेत्यांवर ओढवून घेतला. हे म्हणजे ‘चोर की दाढी में तिनका’ असेच आहे, असेही सतीश मुंडे यांनी म्हटले आहे.