अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST2021-09-08T04:40:49+5:302021-09-08T04:40:49+5:30

धारूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धारूर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलाव फुटण्याच्या भीतीने दुसऱ्यांदा फोडावा ...

The drain of Aranwadi storage lake burst for the second time | अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडला

अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडला

धारूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धारूर तालुक्यातील अरणवाडी साठवण तलाव फुटण्याच्या भीतीने दुसऱ्यांदा फोडावा लागला. तलावाचे बोगस काम व पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही वेळ आली. तालुक्यातील नव्याने तयार केलेला साठवण तलावाची ओसंडून भरले आहे. यातच पिचिंग खचल्याने तलाव फुटण्याची भीती निर्माण झाल्याने लघु पाटबंधारे विभागाने तलावाचा सांडवा फोडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वीच तलावाच्या खाली नदीकाठच्या काही कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले. मंगळवारी दुपारी पोकलेनच्या साहाय्याने तलावाचा सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचे काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. दरम्यान तलाव क्षेत्रातील गावांना धोका निर्माण होऊ नये यासाठी घेण्यात येत आहे त्यामुळे परिसरातील लोकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले

070921\1952-img-20210907-wa0064.jpg

अरणवाडी सांडवा फोडताना

Web Title: The drain of Aranwadi storage lake burst for the second time