एसकेएच वैद्यकीय महाविद्यालयात डॉ.हौनिमन जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST2021-04-12T04:31:23+5:302021-04-12T04:31:23+5:30

आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे सल्लागार प्राचार्य डॉ.अरुण भस्मे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, होमिओपॅथी हे जगातील दोन क्रमाकांची पॅथी ...

Dr. Honeyman Jayanti Celebration at SKH Medical College | एसकेएच वैद्यकीय महाविद्यालयात डॉ.हौनिमन जयंती साजरी

एसकेएच वैद्यकीय महाविद्यालयात डॉ.हौनिमन जयंती साजरी

आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे सल्लागार प्राचार्य डॉ.अरुण भस्मे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, होमिओपॅथी हे जगातील दोन क्रमाकांची पॅथी आहे. अनेक रोग होमिओपॅथीने बरे करता येतात, तर काही साथ रोगावर रोग प्रतिबंधक उपाय म्हणून उपयोगी पडते. आर्सेनिक व ट्युबर्क्युलिम ही दोन औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घेऊन घेतल्यास, कोरोनासारख्या आजारावर मात करत येते.

प्रास्ताविक भाषणामध्ये उपप्राचार्य डॉ.गणेश पांगारकर यांनी हौनिमन यांचा जन्म दिवस हा ‘होमिओपॅथी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. ते ॲलोपॅथी डॉक्टर होते. त्यांनी होमिओपॅथी औषधाचे संशोधन करून ही औषधोपचार पद्धती सुरू केली. डॉ.अजय कुलकर्णी, डॉ.सातपुते यांनीही मनोगत व्यक्त केले, तर काही विद्यार्थ्यांनी डॉ.हौनिमन यांच्या जीवनावर प्रेझेन्टेशन दिले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सातपुते व बाहेती उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर होमिओपॅथिक क्युज ठेवण्यात आले. या कार्यक्रमास डॉ.अंजली पवार, डॉ.नासेर शेख, डॉ.अतीक अहमद प्रा.रावसाहेब हंगे, डॉ.जायभाये, डॉ.राजेश कुलकर्णी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

===Photopath===

110421\11bed_9_11042021_14.jpg

===Caption===

डॉ. हौनीमन जयंती साजरी

Web Title: Dr. Honeyman Jayanti Celebration at SKH Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.