डॉ. तात्यासाहेब लहाने यांचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:31 IST2021-08-01T04:31:09+5:302021-08-01T04:31:09+5:30

पिकावर औषध फवारणीला वेग शिरूर कासार : तालुक्यात पिकावर सध्या मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतात कीटकनाशके ...

Dr. Glory ceremony of Tatyasaheb Lahane | डॉ. तात्यासाहेब लहाने यांचा गौरव सोहळा

डॉ. तात्यासाहेब लहाने यांचा गौरव सोहळा

पिकावर औषध फवारणीला वेग

शिरूर कासार : तालुक्यात पिकावर सध्या मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतात कीटकनाशके फवारणीला वेग आला असून, पाठीवर फवारणी यंत्र घेऊन शेतकरी पीक किडीपासून मुक्त करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे.

पावसाकडे लागले डोळे

शिरूर कासार : तालुक्यात आठ-दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली, शेतातील सर्व कामे अंतिम टप्प्यात आली असून आता मोठ्या पावसासाठी शेतकरी आभाळाकडे पाहत आहे.

दुपारनंतर रोड मोठा होतो

शिरूर कासार : शहराचा मुख्य रस्ता ओळखला जाणारा रस्ता दुपारनंतर मोठा दिसतो, जोपर्यंत दुकाना सुरू असतात तोपर्यंत रस्त्यावर मोठी वर्दळ असल्याने तो कमी पडतो मात्र दुपारी साडेबारा वाजले की दुकान बंद होताच हा रस्ता मोठा झाल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदी कराव्यात

शिरूर कासार : आपल्या पिकांची आपणच सातबारावर नोंद करण्यासाठी मोबाईलवर दिलेल्या ॲपवर पिकनिहाय नोंदणी करावी जेणे करून शासनाकडून मिळणारा लाभ शेतकऱ्यांना मिळेल अन्यथा विमा, अनुदान यांसारख्या आपत्कालीन मदतीपासून वंचित रहावे लागेल. त्यासाठी आपल्या पिकांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.

Web Title: Dr. Glory ceremony of Tatyasaheb Lahane